Join us

स्पर्शविरहित सेवेसाठी १५ हजार प्रवाशांनी मोजले अतिरिक्त ५ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात सुरक्षित प्रवासाकडे प्रवाशांचा कल दिसून येत आहे. मुंबई विमानतळावर तर स्पर्शविरहित सेवेसाठी १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात सुरक्षित प्रवासाकडे प्रवाशांचा कल दिसून येत आहे. मुंबई विमानतळावर तर स्पर्शविरहित सेवेसाठी १५ हजारांहून अधिक प्रवाशांनी अतिरिक्त ५ हजार रुपये मोजल्याचे समोर आले आहे.

हवाई प्रवाशांना प्रवासादरम्यान अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विमानतळावर ‘प्रणाम’ सेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रवाशांना विमानतळ टर्मिनल आवारात प्रवेश केल्यापासून ते विमानात त्यांच्या आसनापर्यंत बसेपर्यंत प्रत्येक टप्प्यांत विविध प्रकारची अतिरिक्त सेवा दिली जाते. शिवाय विनास्पर्श सुरक्षित वावरासह विशेष लाऊंजमध्ये बसण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी अडीज ते पाच हजारापर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

मागील चार महिन्यांत १५ हजारांहून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी ३३ टक्के प्रवासी पहिल्यांदा प्रवास करणारे होते. ५०० ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, सेवेचा लाभ घेणारे सर्वाधिक प्रवासी २५ ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. या सेवेअंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीचे शुल्क पाच ते ६८५० रुपयांपर्यंत, तर देशांतर्गत प्रवाशांसाठी २५०० व ३५०० रुपये शुल्क आकारले जाते.