Join us

तर..550 मतदारांचा बहिष्कार!

By admin | Published: September 20, 2014 11:15 PM

ठाकुर्ली-चोळेगावातील मंगलकलश या सोसायटीतील तब्बल 177 सदनिकांमधील सुमारे 55क् मतदार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या जाणुनबुजून दुर्लक्षामुळे अनेक गैरसोयींसह मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची टीका करीत ठाकुर्ली-चोळेगावातील मंगलकलश या सोसायटीतील तब्बल 177 सदनिकांमधील सुमारे 55क् मतदार विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात आहेत.
येथील विविध गैरसोयींसह अन्य तांत्रिक त्रुटींबाबत वेळोवेळी महापालिकेच्या नगररचनाकार विभागातील अधिका-यांसह महापालिका आयुक्तांना साकडे घालूनही त्याचा काहीही परिणाम न झाल्याने या निर्णयाप्रत आल्याचे सोयसटीचे सचिव राजीव शेख यांनी सांगितले. येथील काही उपद्रवी रहीवाश्यांना शिवीगाळ करणो, अर्वाच्च भाषेत बोलणो यासह अन्य कारणांनी मानसिक त्रस देणो अशा घटना वारंवार घडत आहेत, याबाबत रामनगर पोलीस ठाण्यातही अनेकदा गा:हाणो मांडूनही संबंधित पोलिसांनी काहीही दखल घेतली नसल्याचेही सांगण्यात आले. 
अशा तक्रारी केल्यास पूर्वीपेक्षा अधिकच जाचक त्रस वाढला असल्याने रहिवासी त्रस्त असल्याचेही शेख म्हणाले.
राज्य शासनाच्या धोरणानुसार व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार येथील सोसायटीचा 7/12 सोसायटीच्या नावे करण्याबाबतही अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विकासाकडून घरे ओनरशिप पद्धतीने घेतल्यानंतरही हा त्रस सहन करावा लागत असल्याने त्याची दखल महापालिकेने घ्यावी आणि योग्य तो तोडगा काढावा एवढीच माफक अपेक्षा येथिल रहिवाश्यांची असल्याचे त्यांनी सांगितले.
जेथे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे त्या ठिकाणी केवळ नावाला मतदान करण्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा त्यावर बहिष्कार टाकण्याचा पर्याय योग्य नाही का असा सवालही सोसायटीचे अध्यक्ष अरुणाचलम् यांनी केला आहे. रहिवाशांच्या सांगण्यानुसार महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र यासंदर्भातील तक्रार अथवा गा-हाणो 
त्यांच्यार्पयत कधीही आलेले नसल्याचे ‘लोकमत’ला स्पष्ट केले. 
(वार्ताहर)
 
असंख्य समस्या
4दोन दिवसांपूर्वीच या सोसायटीत दोन ठिकाणी घरफोडीची घटना झाली.  सोसायटीत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसी कॅमेरा-टीव्ही लावण्यासंदर्भातही अनेक अडचणी येत असून पोलीस यंत्रणाही त्या दृष्टीने कडक उपाययोजना करीत नाही.