Join us

दिव्यांग डब्यात १ हजार ५८१ जणांना पकडले, 4 लाखांचा दंड वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 4:24 AM

आॅक्टोबर महिन्यातील कारवाई

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधील दिव्यांग डब्यात रेल्वे सुरक्षा बलाने धडक कारवाई केली. दिव्यांग डब्यात प्रवास करणाऱ्या १ हजार ५८१ जणांना पकडण्यात आले. या कारवाईतून ४ लाख ४४ हजारांची दंडवसुली करण्यात आली. आॅक्टोबर महिन्यात ही कारवाई करण्यात आली़

गर्दीच्या वेळी ६० दिव्यांग डब्यात एक जवान तैनात करण्याची मोहीम रेल्वेने सुरू केली आहे. दिव्यांग प्रवाशांच्या तक्रारीनुसार ६० लोकल निवडण्यात आल्या आहेत़ या लोकलमध्ये दिव्यांग डब्यातून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात़ या लोकल सीएसएमटी ते कसारा-खोपोली या मार्गावरील आहेत. सामान्य प्रवासी डब्यात असल्याने दिव्यांग व्यक्तींना चढ-उतार करताना अडचण होते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक कारवाई ठाणे स्थानकात केली आहे. दिव्यांग डब्यातून प्रवास करणाºया ४३४ सामान्य प्रवाशांना पकडण्यात आले आहे, तर दादर स्थानकातून १२४, डोंबिवली स्थानकातून ९१, दिवा स्थानकातून ४५, कुर्ला स्थानकातून ३७, मुलुंड स्थानकातून ३२ सामान्य प्रवाशांना पकडण्यात आलेआहे.सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी ३० लोकलमध्ये धडक कारवाई केली जाते. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत धडक कारवाई केली जाते, तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कारवाई केली जाते. यादरम्यान वेगवेगळ्या वेळेच्या ६० लोकलमध्ये धडक कारवाई केली जाते. यामध्ये जलद, धिम्या लोकलचा समावेश आहे. या वेळेसह इतर वेळीही दिव्यांग डब्यातील प्रवाशांवर कारवाई केली जाते. दिव्यांग प्रवाशांचा प्रवास योग्यरीत्या होण्यासाठी कारवाईचे सत्र सुरू असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाºयांनी दिली. 

टॅग्स :मुंबईरेल्वे