Join us

मुंबईतील पासपोर्ट सेवा केंद्रातील भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयच्या धाडी सुरूच, एका दलालाकडून १.५९ कोटींची रोकड जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: July 02, 2024 7:48 PM

Mumbai News: मुंबईतील लोअर परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील (पीएसके) भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून  (सीबीआय) सर्च ऑपरेशन सुरु आहे. या झाडाझडतीदरम्यान एका दलालाकडून १ कोटी ५९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मुंबई  - मुंबईतील लोअर परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील (पीएसके) भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून  (सीबीआय) सर्च ऑपरेशन सुरु आहे. या झाडाझडतीदरम्यान एका दलालाकडून १ कोटी ५९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

२६ जूनला परळ व मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी व विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी केली. यावेळी संशयीत अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील व मोबाइलची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, सोशल मिडियावरील संदेश व युपीआय वरील व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. त्यात संबंधीत अधिकाऱ्यांचे दलालांसोबत काही व्यवहार आढळले. दलालांचे काम करण्याच्या बदल्यात हे व्यवहार झाल्याचा संशय आहे.  याप्रकरणी सीबीआयने १४ पासपोर्ट अधिकाऱअयांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत शुक्रवारी १२ गुन्हे दाखल नोंदवले. याप्रकरणी पारपत्र सेवा केंद्रांवरील पारपत्र सहाय्यक आणि दलाल यांच्याशी संबंधीत नाशिक व मुंबईतील ३३ ठिकाणी सीबीआयने सर्च ऑपरेशन राबवत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. पासपोर्ट अधिकारी अवघ्या दोन ते तीन हजारातही दलालांशी हातमिळवणी करून त्यांना पासपोर्ट सेवा पुरवत होते.

त्यापाठोपाठ ३० ते १ जुलै दरम्यान सर्च ऑपरेशन सुरुच ठेवून एका पीएसके दलालालच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. यावेळी, एक कोटी ५९ लाखांची रोकड आणि पाच डायरी, तांत्रिक पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहे. यात, काही भ्रष्ट पासपोर्ट अधिकाऱ्यांचे कनेक्शन समोर येत असून अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :मुंबई