Join us

मुंबईत दिवसभरात १ हजार ५९८ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत सोमवारी दिवसभरात १ हजार ५९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत सोमवारी दिवसभरात १ हजार ५९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ६२ हजार ७८९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्क्यांवर पोहोचला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २८० दिवसांवर गेला आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णवाढीचा दर ०.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईत सोमवारी ५४४ रुग्ण तर ११ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या शहर उपनगरात २ लाख ८६ हजार ५९० कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा १० हजार ९१३ झाला आहे. मुंबईत १२ हजार ४७७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अन्य कारणांमुळे आतापर्यंत ८२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.

शहर उपनगरात चाळ व झोपडट्टीच्या वस्तीत ४७१ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५ हजार ४५१ इतकी आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या १९ लाख ९८ हजार ७६४ चाचण्या झाल्या आहेत.

६८ टक्के खाटा रिक्त

मुंबई पालिकेच्या कोविड रुग्णालये आणि केंद्रांमधील जवळपास ६८ टक्के साधे बेड आणि ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. सध्या ७१ टक्के गंभीर गुंतागुंत नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर, २३ टक्के लक्षणे आणि फक्त ६ टक्के गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.