वरिष्ठांची खास मर्जी असल्याने 16 लाचखोर पोलिसांना अभय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:02 PM2023-07-17T12:02:03+5:302023-07-17T12:02:34+5:30

सात महिन्यात ९९ पोलीस एसीबीच्या जाळ्यात

16 bribe-taking policemen are protected due to the special favor of seniors | वरिष्ठांची खास मर्जी असल्याने 16 लाचखोर पोलिसांना अभय

वरिष्ठांची खास मर्जी असल्याने 16 लाचखोर पोलिसांना अभय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयाच्या बोगस डॉक्टर प्रकरणाचा तपास अधिकारीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्यानंतर खळबळ उडाली. गेल्या ७ महिन्यांत एकूण ९९ पोलिस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. तर, दुसरीकडे कारवाई होऊनही वरिष्ठांच्या कृपाशीर्वादाने आतापर्यंत १६ पोलिसांचे निलंबन झालेले नाही. यामध्ये मुंबईतील ४ जणांचा समावेश आहे. 

मुलुंडमध्ये एसीबीने केलेल्या कारवाईत मुलुंड पोलिस ठाण्यातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षण (गुन्हे) भूषण मुकुंदलाल दायमा (४०) याच्यासह पोलिस हवालदार रमेश मच्छिंद्र बतकळस (४६) यांच्यावर कारवाई केली गेली. त्यांनी मदतीच्या नावाखाली आरोपीकडे २५ लाखांची मागणी केली होती. 
राज्यभरात गेल्या ७ महिन्यांत ४७२ सापळे रचून कारवाई करत ६५९ जणांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ७२८ होता. यामध्ये महसूल विभागाची (१२१) आघाडी कायम असून पोलिस विभाग (८४) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

कोणी लाच मागत असेल, तर येथे करा संपर्क 
लाच मागणे तसेच देणे  हा देखील गुन्हा असल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. कोणी लाच मागत असल्यास तत्काळ एसीबीकडे धाव घ्या किंंवा  एसीबीच्या १०६४ हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकड़ून करण्यात येत आहे.

दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या बहाण्याने १ लाखाची लाच मागणारे कुलाबा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक वैभव दत्तात्रय पेटकर ( ५१), पोलिस नाईक विलास बुधाजी भांडकोळी (३७) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला. तर गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस कारवाई करण्यात आली.

निलंबनाच्या कारवाईस टाळाटाळ का?
n जानेवारी ते १३ जुलैपर्यंत मुंबईत एकूण १९ सापळा कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. 
n दुसरीकडे कारवाई होऊन देखील प्रशासनाला निलंबनाची कारवाई करण्यास मुहूर्त मिळत नसल्याचेही एसीबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.  
n आतापर्यंत १८९ जणांवर लाचखोरी प्रकरणी कारवाई करूनही अद्याप त्यांचे निलंबनही केले गेलेले नाही. यामध्ये मुंबईतील चार पोलिसांसह अन्य विविध विभागातील एकूण २८ कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

    मुंबई    १९    २२
    ठाणे    ५६    ७९
    पुणे    ८४    १२१
    नाशिक    १०१    १४८
    नागपूर    ४५    ६७
    अमरावती    ५०    ६९
    नांदेड    ३७    ४५

    विभाग    कारवाई    अटक 
    महसूल    १२१    १२७ 
    पोलिस    ८४    ९९
    महानगरपालिका    २९    २६
    शिक्षण    २३    २७

 

Web Title: 16 bribe-taking policemen are protected due to the special favor of seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.