१६ कर्मचा-यांची सुखरूप सुटका, जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:18 AM2017-11-23T06:18:36+5:302017-11-23T06:19:12+5:30
मुंबईपासून ९५ सागरी मैल अंतरावर असलेले शिंपिंग कॉपोर्रेशनचे रत्ना हे मालवाहू जहाज समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे
मुंबई : मुंबईपासून ९५ सागरी मैल अंतरावर असलेले शिंपिंग कॉपोर्रेशनचे रत्ना हे मालवाहू जहाज समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. इंजिनमध्ये पाणी भरल्याने जहाज बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. जहाजावरील १६ कर्मचाºयांना शिंपिंग कॉपोर्रेशनच्या जहाजाने वाचवल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या सर्व कर्मचाºयांना बुधवारी सुखरूपपणे किनाºयावर आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ओएनजीसी कंपनीसाठी काम करणाºया रत्ना जहाजात मंंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शेजारून जाणाºया दुसºया जहाजामधील कर्मचाºयांनी बुडणाºया जहाजावरील १६ कर्मचाºयांची सुटका केली. केवळ पाच वर्षे जुने असलेले रत्ना हे जहाज बुडाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. रत्ना बुडाल्याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या जहाजातून कर्मचाºयांसाठी पाणी, अन्नधान्य वगैरे सामान्य बाबींची वाहतूक सुरू होती. त्यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले नसल्याची माहिती शिपिंग कापोर्रेशनचे संचालक कॅप्टन अनुप शर्मा यांनी दिली.