ठाणे-दिवादरम्यान रविवारी होणार १६ तासांचा मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:45 AM2022-01-20T09:45:22+5:302022-01-20T09:46:09+5:30

ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणेदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गाड्या धावतील. दादर येथून २२ जानेवारी रोजी रात्री ११.४० पासून ते २३ जानेवारी  रोजी पहाटे २.०० पर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

16 hour megablock will be held on Sunday between Thane and Diwa | ठाणे-दिवादरम्यान रविवारी होणार १६ तासांचा मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

ठाणे-दिवादरम्यान रविवारी होणार १६ तासांचा मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

Next

मुंबई :  ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गाच्या कामासाठी डाऊन जलद मार्गावर रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत १४ तासांचा, तर रविवारी दुपारी १२.३० पासून ते २.३० पर्यंत अप जलद मार्गावर दोन तासांचा मोगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
 
ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणेदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर गाड्या धावतील. दादर येथून २२ जानेवारी रोजी रात्री ११.४० पासून ते २३ जानेवारी  रोजी पहाटे २.०० पर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या ठाणे स्थानकात थांबणार नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून  २३ जानेवारी रोजी पहाटे २.०० पासून ते ब्लॉक पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या लोकल, मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. कल्याणकडे जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नसल्याने या प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरून संबंधित गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली आहे. 

पनवेलहून सुटणाऱ्या  एक्स्प्रेस 
लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस 
मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस 
मुंबई - मडगाव मांडवी एक्स्प्रेस

पनवेल येथे थांबणाऱ्या गाड्या
तिरुवनंतपुरम - लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस 
मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 
मडगाव - मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस

रद्द केलेल्या एक्स्प्रेस गाड्या  
नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस

रविवारी रद्द
मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
मुंबई-करमळी-मुंबई तेजस एक्स्प्रेस
मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस
जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस

Web Title: 16 hour megablock will be held on Sunday between Thane and Diwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.