Join us

जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझमध्ये सोमवारी १६ तासांचा पाणीब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 11:30 AM

पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे राहणार बंद.

मुंबई : मुंबईतील विविध ठिकाणच्या जलवाहिन्यांचे काम सध्या सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूझ येथील काही परिसरात पाणीपुरवठा सोमवारी (दि. ५) बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ५ जून रोजी सकाळी ८ पासून मध्यरात्री १२ पर्यंत म्हणजेच १६ तास हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

के वॉर्ड पूर्व येथील महाकाली गुंफा मार्गावरील रम्य जीवन सोसायटीजवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी.डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी पूर्व येथे नवीन १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम सोमवारी पालिकेच्या जलअभियंता विभागामार्फत सकाळी  ८ पासून ते मध्यरात्री १२ पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. 

कोणत्या परिसरात काय होणार परिणाम त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाउंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद. सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमानगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजीनगर, संभाजीनगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्रीनगर, राजेंद्र प्रसादनगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विले-पार्ले पूर्व तसेच विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, अंधेरी पूर्व पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व)- पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व)- पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.

टॅग्स :मुंबईपाणी