Join us

बेस्ट प्रवाशांमध्ये तीन आठवड्यांत १.६ लाखांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:08 AM

मुंबई - बेस्ट उपक्रमामध्ये काही बस मार्गांमध्ये बदल आणि २७ नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या ...

मुंबई - बेस्ट उपक्रमामध्ये काही बस मार्गांमध्ये बदल आणि २७ नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये प्रवासी संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बेस्ट आगारातील आकडेवारीनुसार शुक्रवारी २३ लाख ७७ हजार प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. ऑक्टोबर महिन्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कोविड काळात अत्यावश्यक सेवेतील लाखभर कर्मचारीच बसगाड्यांनी प्रवास करीत होते. जून २०२० मध्ये '' मिशन बिगेन अगेन '' सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या अडीच लाखांवर पोहोचली. त्यानंतरही रेल्वे प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होऊ लागली. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येतही वाढ होऊ लागली आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यापासून बेस्ट उपक्रमाने बस मार्गांमध्ये काही बदल केले. त्यानुसार कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचण्यासाठी जलद बस मार्ग सुरू करण्यात आले. तर ५३ रेल्वे स्थानकाला जोडणारे कमी अंतराचे बसमार्गही सुरू करण्यात आले. यामुळे ३० ऑगस्ट रोजी २५ लाख २५ हजार एवढी असलेली प्रवासी संख्या आता वाढत २५ लाख ७७ हजारांवर पोहोचली आहे. कोविडपूर्वी दररोज ३४ लाख प्रवासी प्रवास करीत होते.

तारीख... प्रवासी..... उत्पन्न

३० ऑगस्ट - २३ लाख ७७ हजार

६ सप्टेंबर - २५ लाख २५ हजार

२५ सप्टेंबर - २५ लाख ७७ हजार