Join us

मंत्रिमंडळ बैठकीला १६ मंत्र्यांची दांडी; दिवाळीमुळे मंत्री मतदारसंघातच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 7:21 AM

या आठवड्यात मंगळवारी व बुधवारी दिवाळीची सुट्टी असल्याने बैठक झाली नाही.

मुंबई : मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीला २९ मंत्र्यांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केवळ १३ मंत्री उपस्थित होते, तर १६ मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारली.

या आठवड्यात मंगळवारी व बुधवारी दिवाळीची सुट्टी असल्याने बैठक झाली नाही. तसेच बैठक होणार नाही असेच चित्र होते. मात्र अचानक शुक्रवारी बैठक घेण्याचे गुरुवारी ठरवण्यात आले. बहुतांश मंत्री दिवाळीमुळे मतदारसंघात होते, ऐनवेळी बैठक ठरल्याने अनेक मंत्री आले नाहीत. 

गैरहजर मंत्री

१) छगन भुजबळ, २) राधाकृष्ण विखे-पाटील, ३) संदीपान भुमरे, ४) उदय सामंत, ५) संजय राठोड, ६) अतुल सावे, ७) शंभूराज देसाई, ८) अदिती तटकरे, ९) संजय बनसोडे, १०) अनिल पाटील, ११) अब्दुल सत्तार, १२) रवींद्र चव्हाण, १३) गुलाबराव पाटील, १४) हसन मुश्रीफ, १५) धर्मराव अत्राम, १६) सुरेश खाडे 

हजर असलेले मंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, दादा भुसे, गिरीश महाजन, तानाजी सावंत, विजयकुमार गावित, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा आणि सुधीर मुनगंटीवार

हे टाइमपास मंत्रिमंडळ : पटोलेमंत्रिमंडळाच्या बैठकीला १३ मंत्री अनुपस्थित राहत असतील तर महाराष्ट्राचे नुकसानच आहे. आधीच १७ जागा रिकाम्या आहेत. हे टाइमपास मंत्रिमंडळ आहे.     - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :महाराष्ट्र सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार