Join us

मुंबई महापालिकेच्या अँटिजन चाचणी मोहिमेत १६ पालिका कर्मचारी, ३१ पोलीस बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 6:18 AM

मुंबई पालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, अशा विभागातील पालिका कर्मचाºयांच्या अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पालिका प्रशासनाने शहर, उपनगरात शुक्रवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अँटिजन चाचण्या सुरू केल्या आहेत. शहर, उपनगरात शुक्रवारपासून अँटिजन चाचण्यांना सुरुवात झाली असून आतापर्यंत ३१ पोलीस कर्मचारी व १६ पालिका कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. आतापर्यंत या मोहिमेत ३ हजार ९६८ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत पालिका कर्मचाऱ्यांच्या २,४४३ चाचण्या करण्यात आल्या असून, पोलीस विभागातील १,५२५ कर्मचाºयांची चाचणी करण्यात आली. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आतापर्यंत पालिकेच्या २,६८६ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली असून १०८ कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी अँटिजन चाचण्या सुरू केल्या आहेत.

मुंबई पालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, अशा विभागातील पालिका कर्मचाºयांच्या अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत. त्यात एफ नॉर्थ विभागात तीन, डी विभागात दोन, आर साऊथ विभागात तीन, के वेस्ट विभागात दोन, पी नॉर्थ विभागात तीन, एस विभागात तीन असे एकूण १६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.२,४३२ चाचण्या निगेटिव्हएफ नॉर्थ विभागात ६६६ चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ३ पॉझिटिव्ह तर ६६३ निगेटिव्ह आल्या. डी विभागात १८५ चाचण्यांपैकी २ पॉझिटिव्ह तर १८३ निगेटिव्ह, आर साऊथ विभागात ५४९ चाचण्यांपैकी ३ पॉझिटिव्ह तर ५४६ निगेटिव्ह, के वेस्ट विभागातील २५६ चाचण्यांपैकी २ पॉझिटिव्ह तर २५४ निगेटिव्ह आल्या. याचप्रकारे पी नॉर्थ विभागात ५२२ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३ पॉझिटिव्ह तर ५१९ निगेटिव्ह, एस विभागात २७० चाचण्यांपैकी ३ पॉझिटिव्ह तर २६७ निगेटिव्ह अशा प्रकारे एकूण २ हजार ४४८ चाचण्यांपैकी १६ पॉझिटिव्ह तर २ हजार ४३२ निगेटिव्ह आल्या आहेत.१५ हजारांहून अधिक रुग्ण लक्षणविरहितमुंबईत सध्या २२ हजार ५३६ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात १५ हजार १२८ लक्षणविरहित तर ६ हजारांहून अधिक लक्षणे असलेले रुग्ण आहेत. १ हजार १९७ रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७३ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर ६७ दिवसांवर आला आहे. १९ जुलै ते २५ जुलैपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर १.०३ टक्क्यांवर आला आहे.मुंबईत २५ जुलैपर्यंत कोविडच्या ४ लाख ७८ हजार ८२५ चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २२.७३ टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९ हजार १६१ इतकी आहे. त्यातील ८० हजार २३८ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. एकूण ६ हजार ९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये ४ हजार ८७९ रुग्णांचे वय ५० वर्षांच्या वर होते.मुंबईत रविवारी १,१०१ रुग्णांची नोंद झाली, तर ५७ मृत्यू झाले. या मृतांपैकीपाच रुग्णांचे वय ४० वर्षांच्या खाली होते. ३४ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते. उर्वरित १८ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. दरम्यान शहर, उपनगरात ६३० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तसेच ६ हजार १८ सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिका प्रशासनाने ५ हजार ९२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध लावला आहे.

 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस