मुंबई ते करमळीसाठी १६ विशेष मेल, एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:33 AM2019-04-18T06:33:09+5:302019-04-18T06:33:12+5:30
उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी अशा १६ जादा विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
मुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी अशा १६ जादा विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
गाडी क्रमांक ०१००३ आणि ०१००४ साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी आणि करमळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रत्येकी चार फेऱ्या १९ एप्रिल ते १० मेपर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालविण्यात येतील. सीएसएमटीहून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी साप्ताहिक मेल, एक्स्प्रेस सुटेल. ही गाडी सकाळी साडेआठ वाजता करमळीला पोहोचेल. तिला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबा दिला जाईल.
गाडी क्रमांक ०१००५ आणि ०१००६ साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी आणि करमळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रत्येकी चार फेºया २१ एप्रिल ते १२ मेपर्यंत प्रत्येक रविवारी चालविण्यात येतील. ही गाडी सीएसएमटीहून मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल व दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी करमळीला पोहोचेल. या मेल, एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबा दिला जाईल.