पोईसर नदीतून काढला १६ हजार किलो कचरा
By admin | Published: May 22, 2017 02:28 AM2017-05-22T02:28:15+5:302017-05-22T02:28:15+5:30
मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, ‘स्वच्छ नदी अभियान’ मोहीम राबविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, ‘स्वच्छ नदी अभियान’ मोहीम राबविण्यात आली आहे. ही मोहीम रविवारी सकाळी ७.३० वाजता कांदिवली पूर्वेकडील बिहार टेकडी मार्गावरून सुरू झाली. बिहार टेकडी येथून वाहणाऱ्या पोईसर नदीतून तब्बल १६ हजार किलो कचरा आणि गाळ काढण्यात आला.
रिव्हर मार्चचे सभासद, स्थानिक नगरसेवक, महापालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.
महापालिकेची जेसीबी मशिन येथे असतानाही पुरेसा कचरा काढण्यात आला नाही. परिणामी, रिव्हर मार्चच्या सदस्यांनी हातानेच नदीच्या पात्रातून कचरा काढला. दरम्यान, सोमवारी सकाळी ९ वाजता रिव्हर मार्चचे कार्यकर्ते खासदार
गोपाळ शेट्टी यांची भेट घेणार आहेत आणि नदीपात्रात होत असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाविरोधात आवाज उठवणार आहेत.
येत्या रविवारी पोईसर नदीमध्ये पाणथळींची लागवड करण्यात
येणार आहे, असेही सदस्यांनी सांगितले.