कासा : पावसाने धरलेला जोर आज पाचव्यादिवशी सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळविणारा ठरला. वसई पूर्व भागाला गुरुवारी जोरदार पावसाने झोडपल्याने भाताणे, मेढे, शिरवली, तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आज येथील १६ गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातील कासा पूल सात तास पाण्याखाली गेल्याने नाशिक - डहाणू रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाले.सतत पाच दिवसापासून पावसाची संततधार सुुरु असून त्यामुळे तालुक्यातील सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. धामणी धरणातून अतिवृष्टीमुळे पाणी सोडण्यात आले असल्याने कासा येथील सूर्या नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहे. धामणी धरण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे सकाळी ९.०० पासून पुलावरुन पाणी जावू लागले. संध्याकाळी ४ नंतर पुलावरुन पाणी ओसरले. पुलावरील डांबराचा काही ठिकाणचा थर निघाला आहे, तसेच मोठ - मोठे खड्डे पडले.
१६ गावांचा संपर्क तुटला
By admin | Published: August 01, 2014 3:22 AM