उरणमध्ये १६० मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद

By admin | Published: July 17, 2014 01:19 AM2014-07-17T01:19:47+5:302014-07-17T01:19:47+5:30

रायगड जिल्ह्यात १ जून जून ते १५ जुलै या कालावधीत सरासरी पाऊस ६६६.४४ मि.मी. पाऊस झाला असून, पावसाचे सातत्य कायम राहल्याने शेतकरी सुखावला आहे

160 mm in Uran Maximum Rainfall Record | उरणमध्ये १६० मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद

उरणमध्ये १६० मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात १ जून जून ते १५ जुलै या कालावधीत सरासरी पाऊस ६६६.४४ मि.मी. पाऊस झाला असून, पावसाचे सातत्य कायम राहल्याने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद उरण येथे १६० मिमी झाली आहे.
रायगड पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या कोलाड विभागातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी सुतारवाडी, पाभरे व संदेरी हे तीन लघू पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरुन वाहू लागले आहेत. उर्वरित प्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ७५ टक्केपेक्षा अधिक, सहा प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, नऊ प्रकल्पात २५ ते ५० टक्के तर नऊ प्रकल्पांत २५ टक्केपेक्षा कमी जलसाठा संकलित झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 160 mm in Uran Maximum Rainfall Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.