Join us

राज्यभरात २४ तासांत १६० पोलिसांची कोरोनावर मात; बाधितांचा आकडा १,८८९ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 4:16 AM

२४ तासांत तब्बल १६० पोलीस उपचार घेत बरे झाले. उर्वरित १,०३१ जणांवर उपचार सुरू आहेत

मुंबई : कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढत असला तरी बरे होणाऱ्या पोलिसांचे प्रमाणही वाढत आहे. २४ तासांत ८० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून १६० जणांनी कोरोनावर मात केल्याचे राज्य पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले. राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,८८९ वर पोहोचला असून आतापर्यंत २० जणांना जीव गमवावा लागला आहे. 

२४ तासांत तब्बल १६० पोलीस उपचार घेत बरे झाले. उर्वरित १,०३१ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ६७ अधिकारी आणि ७७१ अंमलदार अशा एकूण ८३८ पोलिसांनी कोरोनावर मात केली. यातील अनेक जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. दुसरीकडे आतापर्यंत पोलिसांवरील हल्ल्याचे २५२ प्रकार घडले असून याप्रकरणी ८३२ जणांवर कारवाई करण्यात आली. या हल्ल्यांत ८६ पोलीस जखमी झाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस