Join us

अकरावीच्या विशेष फेरीत १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:46 AM

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार चार याद्या जाहीर करण्यात आल्या.

मुंबई : अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार चार याद्या जाहीर करण्यात आल्या. पण, तरीही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने मुंबई शिक्षण उपसंचालक विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेरी राबविली होती. बुधवारी सायंकाळी पाच वाजचा या फेरीची यादी जाहीर करण्यात आली. या विशेष यादीत १६ हजार २५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. विशेष फेरीसाठी तब्बल १९ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. चार फेºयांनंतर तब्बल ७१ हजार १२३ जागा रिक्त आहेत.बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या फेरीत १६ हजार २५३ पैकी ९ हजार ४५९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर २ हजार २१३ विद्यार्थ्यांना दुसºया आणि १ हजार ३७६ विद्यार्थ्यांना तिसºया पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर, ९२९ आणि ७१९ विद्यार्थ्यांना अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहेत. या पहिल्या विशेष फेरीत जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ व १९ आॅगस्ट रोजी संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. तर आजच्या विशेष फेरीनंतरही मुंबईतील कॉलेजांमध्ये तब्बल ५४ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या चार ही फेºया नुकत्याच पूर्ण झाल्या. या फेºयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले होते. पण, तरीही काही कारणांमुळे त्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडले. या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक विभागाने नुकतीच पहिली विशेष फेरी राबविली होती. या विशेष फेरीची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी संध्याकाळी जाहीर झाली. विशेष फेरीत एकूण १६ हजार २५३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असले तरीही तब्बल तीन हजार विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी दुसºया फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने स्पष्ट केले आहे.>७१ हजार १२३जागा रिक्तअनेक विद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने प्रवेश घेतले नाहीत. विशेष यादीत १६ हजार २५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. चार फेºयांनंतर ७१ हजार १२३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेश मिळेल अशी अपेक्षा आहे.