Join us

राज्यात काेराेनाचे १६ हजार ६२० नवे रुग्ण, ५० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

मुंबईत दिवसभरात १९६२ बाधितलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रविवारी १६ हजार ...

मुंबईत दिवसभरात १९६२ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रविवारी १६ हजार ६२० काेराेनाबाधितांचे निदान झाले असून ५० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे काेरोनाबाधितांची एकूण संख्या २३,१४,४१३ झाली असून बळींचा आकडा ५२ हजार ८६१ आहे, तर मुंबईत दिवसभरात १९६२ काेराेनाबाधित आढळले असून ७ मृत्यू झाले.

राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे. सध्या १ लाख २६ हजार २३१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण २.२८ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू नागपूर ४, पुणे ३, नाशिक २, सोलापूर २, वर्धा २ आणि ठाणे १ असे आहेत. या ५० मृत्यूंमध्ये मुंबई ७, ठाणे २, नवी मुंबई मनपा २, नाशिक मनपा २, मालेगाव मनपा १, पुणे ५, पुणे मनपा ४, पिंपरी-चिंचवड मनपा २, सोलापूर ३, सोलापूर मनपा १, सातारा १, सांगली १, सांगली मिरज-कुपवाड मनपा १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा १, बीड १, नांदेड मनपा १, अमरावती मनपा २, नागपूर मनपा ५, वर्धा ६, चंद्रपूर मनपा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

* राज्यातील काेराेना रुग्णांची संख्या

१४ मार्च - १६ हजार ६२०

१३ मार्च - १५ हजार ६०२

१२ मार्च - १५ हजार ८१७

११ मार्च - १४ हजार ३१७

१० मार्च - १३ हजार ६५९

----------------------