Join us

विकासकाच्या घरातून १७ घातक शस्त्रे जप्त, अभिनेता दिलीप कुमार मालमत्ता प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:56 AM

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, सायरा बानो यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने विकासक समीर भोजवानीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भोजवानीच्या घरावर छापा टाकण्यात आला. भोजवानी पसार झाला असून त्याच्या घरातून १७ घातक शस्त्रे गुन्हे शाखेने जप्त केली आहेत. त्यामुळे भोजवानीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, सायरा बानो यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने विकासक समीर भोजवानीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भोजवानीच्या घरावर छापा टाकण्यात आला. भोजवानी पसार झाला असून त्याच्या घरातून १७ घातक शस्त्रे गुन्हे शाखेने जप्त केली आहेत. त्यामुळे भोजवानीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी वांद्रे, पाली हिल परिसरात सप्टेंबर १९५३मध्ये मूळ मालक खटाव यांच्या सहमतीने हसन लतीफ यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांना येथील बंगला विकत घेतला. हा बंगला बळकावण्यासाठी बांधकाम व्यावसायिक समीर भोजवानी सातत्याने दबाव आणून धमकावत असल्याबाबत ३ जानेवारी रोजी दोघांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. भोजवानीने बनावट कागदपत्रांच्या आधारे या बंगल्यावर मालकी हक्क दाखविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सायरा बानो यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत गुन्हे शाखेने भोजवानीविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.भोजवानीला पकडण्यासाठी त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरातून तपास पथकाने १७ घातक शस्त्रे जप्त केली आहेत. ही शस्त्रे कोठून व कशी आली? याचा शोध सुरू आहे. भोजवानी पसार असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.

टॅग्स :गुन्हा