मुंबई : वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई मुंबई वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. २0१६ मध्ये जवळपास १७ लाख केसेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दारू पिऊन वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, सीट बेल्ट न लावणे, नो पार्किंग, वाहन चालवताना फोनवर बोलणे, ट्रीपल सीट, सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंगचे नियम न पाळणे यासह अनेक वाहतूक नियम वाहन चालकांकडून मोडले जातात. त्या विरोधात कारवाईदेखील केली जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्याला चाप लावण्यासाठी १६ आॅगस्टपासून दंडात मोठी वाढदेखील करण्यात आली. त्यानुसार, वाहन चालकांना दुप्पट ते दहापट दंडाच्या आकारणीस सुरुवात झाली. दुचाकीस्वार विनाहेल्मेट असल्यास ५00 रुपये दंड, तर बेदरकारपणे वाहन चालविल्यास एक हजार रुपये दंडाची आणि तरुणांमध्ये रेसिंगचे प्रमाण अधिक असून त्याला जरब बसावी, यासाठी तब्बल दोन हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला, तर अन्य गुन्ह्यांच्या दंडातही वाढ केली. एकूणच करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे २0१६ मध्ये १७ लाख २९ हजार ३२२ केसेसची नोंद झाली आहे. त्यातून २३ कोटींहून अधिक दंड वसूल केला. २0१५ मध्ये १८ लाख ५४ हजार १९२ केसेस दाखल झाल्या होत्या आणि २१ कोटींहून अधिक दंड वसूल केला होता. (पतिनिधी)वाहन चालकांवर जरब बसावी, यासाठी मुंबईतील सीसीटीव्हींद्वारेही कारवाई केली जात आहे. झेब्रा क्रॉसिंगबरोबरच सिग्नल नियम मोडणार, सीट बेल्ट आणि हेल्मेट न वापरणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे.
नियम उल्लंघनाच्या १७ लाख घटना
By admin | Published: April 10, 2017 6:38 AM