१७ विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: April 15, 2016 01:53 AM2016-04-15T01:53:05+5:302016-04-15T01:53:05+5:30
हाजी अली येथील लाला लजपतराय महाविद्यालय आणि वांद्रे येथील थाडोमल शहानी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन २०१५-१६’ परिषदेत
मुंबई : हाजी अली येथील लाला लजपतराय महाविद्यालय आणि वांद्रे येथील थाडोमल शहानी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन २०१५-१६’ परिषदेत वितरित झालेल्या खाद्यपदार्थातून तब्बल १७ विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची घटना गुरुवारी घडली. या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. यातील दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
थाडोमल महाविद्यालयातील कार्यक्रमाला विविध शाळांच्या १ हजार ४०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रम सुरू असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उपस्थित विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थांचे पॅकेट्स वितरित करण्यात आले. मात्र वितरित करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करण्यात आल्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने पाच विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाला. यातील तीन विद्यार्थ्यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.