पारबंदर प्रकल्पासाठी १७ निविदा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:48 AM2017-07-20T01:48:24+5:302017-07-20T01:48:24+5:30
मुंबई पारबंदर प्रकल्पातील २२ कि.मी. लांबीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ६, तर तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी ५ कंत्राटदारांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पातील २२ कि.मी. लांबीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी ६, तर तिसऱ्या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी ५ कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या आहेत. अशा प्रकारे या प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण १७ कंत्राटदारांनी निविदा सादर केल्याची माहिती आहे. मुंबई पारबंदर या २२ कि. मी. लांबीच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच पुणे एक्स्प्रेस-वे आणि त्यापुढे दक्षिण भारताच्या दिशेने प्रवास करणे सहज व वेगवान होणार आहे.
शिवडीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील १०.३८ कि.मी. लांबीच्या प्रकल्पासाठी एकूण ६ कंत्राटदारांनी सामूहिक निविदा सादर केल्या आहेत. त्यात पहिल्या निविदेत मे. अॅफकोन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., मे. फ्लुओर आॅस्ट्रेलिया प्रा. लि. आणि मे. शापूर्जी पालनजी अॅण्ड कंपनी प्रा. लि. या तीन कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या निविदेत मे. देवू इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि मे. टाटा प्रोजेक्ट्स लि., तिसऱ्या निविदेत मे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि मे. एस. के. इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन कं. लि., चौथ्या निविदेत मे. आय. एल. अॅण्ड एफ. एस. ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क्स लि. आणि मे. एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि., पाचव्या निविदेत मे. आय. टी. डी. सिमेंटेशन इंडिया लि., मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., मे. इटालियन थाय डेव्हलपमेंट पब्लिक कं. लि. आणि मे. सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन कं. लि. आणि सहाव्या निविदेत मे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि. इंडिया आणि मे. आय. एच. आय. इन्फ्रास्टक्चर सिस्टीम्स कं. यांनी समूहानेनिविदा सादर केल्या आहेत.
याशिवाय तिसऱ्या टप्प्यातील समुद्रातील १८.१८७ कि.मी. ते चिर्लेपर्यंतच्या ३.६१३ कि.मी. प्रकल्पासाठी पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या आहेत. त्यात मे. अॅफकोन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि., मे. फ्लुओर आॅस्ट्रेलिया प्रा. लि. आणि मे. शापूर्जी पालनजी अॅण्ड कंपनी प्रा. लि. या समूहासह मे. आय. टी. डी. सिमेंटेशन इंडिया लि., मे. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि मे. जे. एम. म्हात्रे इन्फा प्रा. लि. या कंपन्यांच्या समूहाचा समावेश आहे. तर या टप्प्यासाठी मे. जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि., मे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि. आणि मे. एन. सी. सी. लि. या कंपन्यांनी वैयक्तिक निविदा भरली आहे.