आरेत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:07 AM2021-02-17T04:07:28+5:302021-02-17T04:07:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोरेगावच्या आरे परिसरात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपी हा मुलीचा आत्येभाऊ असल्याची ...

A 17-year-old girl was raped in Aret | आरेत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

आरेत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगावच्या आरे परिसरात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपी हा मुलीचा आत्येभाऊ असल्याची माहिती असून, आरे पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

पीडित मुलगी ही वांद्रे परिसरात राहत असून आरोपी आरे परिसरात राहतो. त्याला कामावरून सुट्टी मिळाली की ताे मुलीच्या घरी राहायला येत असे. सहा महिन्यांपूर्वी त्याने तिला आरे कॉलनी येथील घरात भेटायला बोलावले हाेते. ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध झाले आणि मुलीला दिवस गेले. याबाबत घरच्यांना समजले आणि त्यांनी १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी वांद्रे पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. जी नंतर झिरोझिरोवर आरे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. आरोपी हा सैन्यात कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: A 17-year-old girl was raped in Aret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.