Join us

मुंबईत १७ हजार सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

मुंबई: मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते ११ हजारांच्यावर रुग्ण आढळून येत ...

मुंबई: मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज ७ ते ११ हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते, त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. रविवारी १ हजार ६६ नवे रुग्ण आढळून आले होते. सोमवारी घट होऊन ६७६ रुग्ण आढळून आले होते. दिवसभरात पुन्हा किंचित वाढ होऊन ८३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. २३ रुग्णांचा मृत्यू झाला. ५८६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत मंगळवारी ८३१ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ७ हजार ८२ वर पोहोचला आहे. दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४ हजार ९०७ वर पोहोचला आहे. ५ हजार ८६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ७२ हजार ६६४ वर पोहोचली आहे.

मुंबईत सध्या १७ हजार ३२८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५३ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३५ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, १५३ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी २३ हजार ५०३ तर आतापर्यंत एकूण ६२ लाख ९५ हजार २४६ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.