Join us

तलावांत तीन दिवसांत वाढला १७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 9:43 PM

Mumbai News : वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते.

मुंबई - तलाव क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू असल्याने गेल्या तीन दिवसांत जलसाठ्यात सुमारे १७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. सध्या तलावांमध्ये १६.८८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

मुंबईत महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता विश्रांतीच घेतली आहे. तरीही तलाव क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी जलसाठ्यात वाढ करीत आहे. 

सध्या सात तलावांमध्ये मिळून एकूण दोन लाख ४४ हजार २४३ दशलक्ष लिटर जलसाठा जमा आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये १६ हजार ९६८ दशलक्ष लिटर जलसाठा वाढला. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा अधिक आहे. 

२५ जून २०२१ रोजी जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)

तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष)  सध्या

मोडक सागर १६३.१५   १४३. २६       ५०६१०  १५२.६२

तानसा    १२८.६३      ११८.८७      ४५१६६    १२२.५९

विहार    ८०.१२        ७३.९२        १७३११.....७८.१०

तुळशी    १३९.१७        १३१.०७       ५९९६    ..१३७.५८

अप्पर वैतरणा ६०३.५१    ५९७.०२    ०००...५९२.६३

भातसा    १४२.०७        १०४.९०      ९८९०७ ...११२.२४

मध्य वैतरणा २८५.००    २२०.००      २६२५४..२४३.६९

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ -  २४४२४३...१६.८८

२०२० - १२८३००....८.८६

२०१८- ७१०१७...४.९१

 

टॅग्स :मुंबईपाऊसपाणी