Join us

रक्तदान शिबिरात १७५ बाटल्या रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ऐन कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात ऐन कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला रक्तदानासाठी आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत जोगेश्वरीत रक्तदान शिबिरे घेण्यास सुरुवात झाली आहे. यात आतापर्यंत १७५ बाटल्या रक्त संकलन झाले आहे.

मेघवाडी येथील शिवसेना शाखेत नगरसेवक अनंत नर व शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर यांनी रविवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार रवींद्र वायकर यांनी केले. जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख राजेंद्र चंद्रहास आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिरातील रक्त संकलन करण्यात आले. या वेळी १७५ पात्र रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, उपविभाग संघटक प्रियांका आंबोलकर, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, शाखा समन्वयक उदय हेगिष्टे, शाखा संघटक नानी नरवणकर, रिटा राधवा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.