मुंबईजवळ १७५ कोटींचे तरंगते हॉटेल

By admin | Published: August 3, 2015 02:56 AM2015-08-03T02:56:22+5:302015-08-03T02:56:22+5:30

सी प्लेन, चौपाट्यांचा विकास यासह अनेक सुविधा मुंबईत पर्यटकांसाठी आणल्या जात असतानाच आता तब्बल १७५ कोटी रुपयांचे तरंगते हॉटेल (जहाज) मुंबईतील

175 crore flats in Mumbai near Mumbai | मुंबईजवळ १७५ कोटींचे तरंगते हॉटेल

मुंबईजवळ १७५ कोटींचे तरंगते हॉटेल

Next

सुशांत मोरे, मुंबई
सी प्लेन, चौपाट्यांचा विकास यासह अनेक सुविधा मुंबईत पर्यटकांसाठी आणल्या जात असतानाच आता तब्बल १७५ कोटी रुपयांचे तरंगते हॉटेल (जहाज) मुंबईतील समुद्रात अवतरणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) मुंबईकर आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा एका खासगी कंपनीच्या साहाय्याने येत्या आॅक्टोबरमध्ये दाखल होईल. यासाठी एमटीडीसी आणि सदर कंपनीकडून जय्यत तयारी केली जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत येताच गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या तसेच धार्मिक स्थळांसह अनेक ठिकाणांना भेटी देतात. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता एमटीडीसीकडून मुंबईतील पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यावर भर दिला जात आहे. पर्यटकांसाठी सी प्लेनसारखी सेवा आणली गेल्यानंतर तीन चौपाट्यांचा टप्प्याटप्प्यात विकास करण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला आहे. चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच मुंबईतील समुद्रात तरंगणारे हॉटेल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी एमटीडीसी तसेच रश्मी डेव्हलपमेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाने उपलब्ध केले जाणार आहे. राजभवनपासून साधारपणे एक ते दीड किलोमीटर आत तरंगणारे हॉटेल असेल. सहामजली असणाऱ्या या हॉटेलची किंमत तब्बल १७५ कोटी रुपये एवढी आहे. सहामजली हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी अनेक सोयीसुविधा असणार आहेत. बँक्वेट, स्विमिंग पुल, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, बार, सभागृह, हेल्थ क्लब, पर्यटकांना राहण्यासाठी रूम या तरंगणाऱ्या हॉटेलमध्ये असतील. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल ३४0 रुम्स या हॉटेलमध्ये असणार आहेत. हे हॉटेल आॅक्टोबर महिन्यात पर्यटकांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. यापूर्वी मुंबईतील वरळी येथील समुद्रात मागील वर्षीही एका खासगी कंपनीच्या साहाय्याने तीनमजली तरंगणारे हॉटेल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र एक महिना ही सेवा झाल्यानंतर ती बंद करण्यात आली. मात्र वरळी येथील समुद्रात मागील वर्षी सुरू करण्यात आलेली सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: 175 crore flats in Mumbai near Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.