६० धर्मादाय रुग्णालयांमध्ये १७६२ राखीव खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 02:56 AM2018-12-02T02:56:36+5:302018-12-02T02:56:39+5:30
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या धर्मादाय रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी २० टक्के खाटा या आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
मुंबई : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या धर्मादाय रुग्णालयांमधील एकूण खाटांपैकी २० टक्के खाटा या आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गटातील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या खाटांचा अधिक प्रभावी उपयोग नियमितपणे व्हावा यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये येणाऱ्या अतिरिक्त रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या राखीव खाटांवर पाठविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील ६० धर्मादाय रुग्णालयांमध्ये १७६२ राखीव खाटा ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये येणाºया अतिरिक्त रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या राखीव खाटांवर पाठविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या अंतर्गत पूर्वनियोजित किंवा निवडक प्रक्रिया / शस्त्रक्रियांसाठी (ए’ीू३्र५ी स्र१ङ्मूी४ि१ी / र४१ॅी१८) येणाºया निर्धन रुग्णांना प्रथमत: पाठविण्याची कार्यवाही सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी समन्वय साधण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘विशेष कार्य अधिकारी’ यांची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. तसेच याकरिता धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने संगणक आधारित यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील विविध तरतुदींनुसार ‘सार्वजनिक धर्मादाय न्यास’ म्हणून नोंदणी असलेल्या धर्मादाय रुग्णालयांतील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा या निर्धन रुग्णांकरिता, तर १० टक्के खाटा या दुर्बल घटकातील रुग्णांकरिता राखीव ठेवणे आवश्यक आहे. पालिका क्षेत्रातील ६० रुग्णालये व १६ दवाखाने यांची नोंदणी ‘सार्वजनिक न्यास’ म्हणून धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आहे. या ६० रुग्णालयांमध्ये एकूण ८ हजार ७९० खाटा आहेत. यापैकी २० टक्के म्हणजेच १ हजार ७६२ खाटा या आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक गटातील रुग्णांसाठी राखीव आहेत. तसेच यापैकी निम्म्या म्हणजेच ८८१ खाटा निर्धन गटातील रुग्णांसाठी, तर उर्वरित ८८१ या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव आहेत. तथापि, खाटांची ही संख्या रुग्णालयातील परिरक्षणाच्या किंवा विस्ताराच्या कामांमुळे काही अंशी कमी अगर अधिक होऊ शकते.
>गरजू आणि गरीब रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात सुयोग्य उपचार मिळावेत, यासाठी धर्मादाय आयुक्तालयाच्या सहकार्याने संयुक्त कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. यामुळे लवकरच गरजू रुग्णांना उपचारासाठी तुलनेने अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतील. केईएम, नायर व शीव रुग्णालयात लवकरच विशेष कार्य अधिकाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)