मेट्रो सहा साठी १७७० कोटींचे कर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 05:22 PM2020-10-01T17:22:26+5:302020-10-01T17:22:49+5:30

Mumbai metro : एनडीबी बँकेचे अर्थसहाय्य

1770 crore loan sanctioned for Metro 6 | मेट्रो सहा साठी १७७० कोटींचे कर्ज मंजूर

मेट्रो सहा साठी १७७० कोटींचे कर्ज मंजूर

Next

मुंबई : स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्ग या मेट्रो सहा मार्गिकेसाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेने १७७० कोटी रुपयांच्या कर्जपुरवठ्याला मान्यता दिली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या २८ व्या बैठकीत या कर्ज पुरवठ्याला मंजूरी दिल्याची माहिती हाती आली आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत हा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यापुर्वी ‘एनडीबी’ने मेट्रो दोन अ आणि सात साठी १६५२ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केलेला आहे.

स्वामी समर्थनगर (लोखंडवाला) – जेव्हीएलआर- सीप्झ – पवई – कांजूरमार्ग अशा १४.४७ किमी मार्गावर मेट्रो सहा धावणार आहे. इन्फिनीटी माँल (मेट्रो दोन), जेव्हीएलआर (मेट्रो -७) सीप्झ ( मेट्रो -३) जोगेश्वर ( पश्चिम रेल्वे आणि कांजूरमार्ग (मध्य रेल्वे) या स्थानकांना ही मार्गिका संलग्न असेल. या मार्गिकेवर एकूण १३ स्टेशन असतील. या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार ७१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दिल्ली मेट्रो रेल महामंडळ (डीएमआरसी) यांच्याव्दारे ठेव अंशदान कार्यतत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या कर्ज पुरवठ्याला फेब्रुवारी, २०२० मध्ये एनडीबी बँकेच्या संचालक मंडळाने तत्वतः मंजूरी दिली होती. मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज वितरणास हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या ठिकाणच्या मृदा परिक्षणाचे (साँईल टेस्टिंग) ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. युटीलिटी (५७), पायलिंग (४६) पाईल कँप (२९), पाईल वर्क (२०) आणि स्टेशनची १५ टक्के कामे पूर्ण झाली आहे. आँक्टोबर, २०२२ पर्यंत ही मेट्रो रेल्वे कार्यान्वीत करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोना संकटामुळे झालेला खोळंबा आणि अन्य आघाड्यांवरील अडचणींमुळे या मार्गावर मेट्रो धावण्यास २०२३ साल उजाडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर २०३१ पर्यंत या मार्गावर दररोज ७ लाख ७० हजार प्रवासी ये- जा करतील असा अंदाज आहे.

 

Web Title: 1770 crore loan sanctioned for Metro 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.