Join us

१७८ वर्षांपूर्वीचे जे. जे. रुग्णालय पहायचंय? कसं दिसतं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 5:47 AM

राज्यातील सर्वांत जुने असलेले सर जे.जे. रुग्णालयाची स्थापना १८४५ साली झाली.

मुंबई :  

राज्यातील सर्वांत जुने असलेले सर जे.जे. रुग्णालयाची स्थापना १८४५ साली झाली. त्यानंतर काही वर्षांनी ते बांधकाम पाडून सध्याचे रुग्णालय तेथे बांधण्यात आले. मात्र, १८४५ साली  रुग्णालयाची रचना कशी होती, हे पाहता यावे यासाठी त्याचे मॉडेल बनविण्यात आले असून, शनिवारी ते रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत ठेवण्यात येणार आहे. १९७२ सालातील बॅचच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल बनविण्यात पुढाकार घेतला आहे. बॅचला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आकाश कांबळे या तरुणाने हे मॉडेल बनविले आहे. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगतिले की, ‘मी आतापर्यंत सीएसटी स्टेशन, जुने रेल्वे इंजिन, जुने रेल्वेचा गाड्याचे डबे बनविले असून, रेल्वे प्रशासनाला दिले आहे. मला ज्यावेळी जेजेचे १७८ वर्षीय जुने मॉडेल बनविण्याचे काम आले. त्यावेळी मी उत्सुक होतो. त्यांनी मला जुने मॉडेल दाखविले. त्यातील ६० टक्के काम मी नव्याने केले  असून ४० टक्के भाग मी सुधारित करण्याचा प्रयत्न केला आहे. १९७२ च्या बॅचला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्या वेळेचे सर्व विद्यार्थी  मेडिकल कॉलेजला एकत्र जमणार होते. त्यावेळी त्यांनी कॉलेजसाठी काही करता येईल का? अशी विचारणा केली. त्यावेळी अगदी जुन्या जे.जे.च्या रुग्णालयाचे मॉडेल मोडकळीस आलेले आहे, ते दुरुस्त करून चांगले केले, तर नागरिकांना ते पाहता येईल, असे सुचविले, त्यांनी ते मान्य केले. -डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, सर जे.जे. रुग्णालय

टॅग्स :हॉस्पिटल