मुंबईत या वर्षातील १७ वे अवयवदान, तिघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:22+5:302021-07-26T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत शनिवारी २०२१ या वर्षातील १७ वे अवयवदान करण्यात आले. यामुळे तिघांना नवजीवन मिळाल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत शनिवारी २०२१ या वर्षातील १७ वे अवयवदान करण्यात आले. यामुळे तिघांना नवजीवन मिळाल्याची माहिती मुंबई विभागीय अवयवदान समितीने दिली आहे.
८४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अवयवदान करण्यास कुटुंबीयांनी संमती दर्शविली. परळ येथे दाखल असलेल्या या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अवयवदान समितीला कळविण्यात आले. त्यानुसार यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड हे दान करण्यात आले. तीन रुग्णांना हे अवयव प्रत्यारोपित करण्यात आल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. गेल्यावर्षी कोविडमुळे मुंबईत ३० अवयवदान करण्यात आले. मात्र, यंदा हे प्रमाण काही अंशी वाढण्याची शक्यता अवयवदान समितीने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, विविध पातळ्यांवर समितीच्या वतीने अवयवदान करण्याविषयी जनजागृती सुरू आहे, तसेच नागरिकांनी अवयवदानाकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.