Join us

पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 5:23 AM

वेळ आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याची उंची याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. याठिकाणी भरतीच्या पाण्याची उंची दिलेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यावर्षी पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस आहेत. मुंबईत जर यादिवशी जास्त पाऊस पडला तर समुद्रातील उधाण भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाऊ शकत नाही, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते.यावर्षीच्या पावसाळ्यातील साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येण्याचे दिवस, वेळ आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्याची उंची याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. याठिकाणी भरतीच्या पाण्याची उंची दिलेली आहे. ही लाटांची उंची नव्हे हेदेखील सोमण यांनी स्पष्ट केले आहे. 

असे आहेत साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस

दिवस    भरतीची उंची     (मीटरमध्ये)nबुधवार, २३ जून सकाळी १०.५३    ४.५७nगुरुवार, २४ जून सकाळी ११.४५    ४.७७nशुक्रवार, २५ जून दुपारी १२.३३    ४.८५nशनिवार, २६ जून दुपारी १.२३    ४.८५nरविवार, २७ जून दुपारी २.१०    ४.७६nसोमवार, २८ जून दुपारी २.५७    ४.६१ nशुक्रवार, २३ जुलै सकाळी ११.३७    ४.५९ nशनिवार, २४ जुलै दुपारी १२.२४    ४.७१ nरविवार, २५ जुलै दुपारी १.०७    ४.७३ दिवस    भरतीची उंची     (मीटरमध्ये)nसोमवार, २६ जुलै दुपारी १.४८    ४.६८nमंगळवार, २७ जुलै दुपारी २.२७    ४.५५ nमंगळवार, १० ॲागस्ट दुपारी १.२२    ४.५० nबुधवार, ११ ॲागस्ट दुपारी १.५६    ४.५१ nरविवार, २२ ॲागस्ट दुपारी १२.०७    ४.५७nसोमवार, २३ ॲागस्ट दुपारी १२.४३    ४.६१ nमंगळवार, २४ ॲागस्ट दुपारी १.१७    ४.५६nबुधवार, ८ सप्टेंबर दुपारी १२.४८    ४.५६ nगुरुवार, ९ सप्टेंबर दुपारी १.२१    ४.५४   

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या