Join us  

मध्य रेल्वेवर १८ तासांचा ब्लॉक

By admin | Published: December 29, 2015 2:23 AM

सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ असलेला सर्वांत जुना असा हँकॉक पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलाच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कामांसाठी जानेवारी महिन्यात १८ तासांचा ब्लॉक

मुंबई : सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ असलेला सर्वांत जुना असा हँकॉक पूल तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलाच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कामांसाठी जानेवारी महिन्यात १८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे १00 मेल-एक्स्प्रेस रद्द होण्याची शक्यता असून, लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या ब्लॉकची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.भायखळा ते सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान असलेला हँकॉक ब्रिज १८ नोव्हेंबरपासून पुनर्उभारणीच्या कामासाठी तोडण्यात येत आहे. १३५ वर्षे ओलांडलेला हँकॉक पूल आणि ओव्हरहेड वायरदरम्यान असलेली उंची कमी असल्याने मध्य रेल्वे गाड्यांना भायखळा व सॅण्डहर्स्ट रोडदरम्यान वेगमर्यादा घालण्यात आली आहे. हा ब्लॉक जानेवारी महिन्यातील एखाद्या शनिवारी मध्यरात्रीपासून घेण्यात येईल. ब्लॉक काळात भायखळा, दादर, कुर्ला येथून लोकल तसेच शटल सेवा चालवण्यात येतील, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. ब्लॉकमुळे सीएसटीकडे येणाऱ्या १00पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द होऊ शकतात किंवा त्यांना अन्य ठिकाणी शेवटचा थांबा देण्यात येऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे ५00पेक्षा जास्त लोकल फेऱ्याही यामुळे रद्द होतील. या कालावधीत जादा बेस्ट बसेस सोडण्यासाठी बेस्ट प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. ९ जानेवारीची शक्यता९ जानेवारी रोजी ब्लॉक घेण्याचा विचार मध्य रेल्वेकडून केला जात आहे. यासाठी मरे अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठकाही सुरू आहेत. यापूर्वी २0१0मध्ये मशीद बंदर येथील एका पुलाच्या कामासाठी तब्बल ४८ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.