लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण १८ लाख ८४ हजार १२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७९ टक्क्यांवर पोहोचले. ५१ हजार ९६५ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात शनिवारी २ हजार ९१० रुग्ण ५२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८७ हजार ६७८ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ५० हजार ३८८ झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३७,४३,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८७,६७८ (१४.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,७०५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २,०३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्याचा मृत्युदर २.५४ टक्के असून, दिवसभरात नोंद झालेल्या ५२ मृत्युंमध्ये मुंबई ८, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा १, मीरा-भाईंदर मनपा १, वसई-विरार मनपा १, नाशिक मनपा १, जळगाव मनपा २, जळगाव मनपा २, नंदुरबार ३, पुणे मनपा २, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ६, सोलापूर मनपा २, सांगली-मीरज-कुपवाड मनपा १, रत्नागिरी २, उस्मानाबाद ३, बीड २, यवतमाळ ३, नागपूर २, भंडारा ३, गोंदिया ३, चंद्रपूर १, आणि अन्य राज्य-देशातील(??) २ या रुग्णांचा समावेश आहे.
.....................
(नोट- देशातील हा शब्द बोल्ड केला आहे, ते वाक्य बरोबर आहे का? कृपया पाहणे.)