१८ लाखांवर प्रवासी बेस्टने करतात प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 01:06 AM2020-09-27T01:06:26+5:302020-09-27T01:06:37+5:30
मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी दिलासा दिला आहे. रेल्वे सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी ...
मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनाबेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी दिलासा दिला आहे. रेल्वे सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने बेस्ट बस गाड्यांमध्ये तुफान गर्दी होत आहे. गेल्या पंधरवड्यात ही संख्या आणखी दोन लाखांनी वाढली आहे. त्यामुळे दररोज बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या आता १८ लाखांवर पोहोचली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू होण्यापूर्वी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सुमारे ३५ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र २४ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठीच केवळ बेस्ट बस गाड्या चालविण्यात येत होत्या. त्या काळातही सुमारे दोन लाख प्रवासी दररोज प्रवास करीत होते. ३ जूनपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्या वाढत गेली, तीन महिन्यांत तब्बल १५ लाख प्रवासी वाढले. सध्या बेस्ट उपक्रमामार्फत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या प्रवाशांसाठी बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र बेस्ट बसव्यतिरिक्त प्रवासाचा अन्य पर्याय नसल्यामुळे बसमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज बेस्ट बसगाड्यांच्या ५० हजार फेºया होतात, यापैकी २५ छोट्या मार्गांवर पाच हजार फेºया होतात.
च्जून महिन्यात बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांमधून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या अडीच लाख एवढी होती. सध्या १८ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. च्बेस्ट उपक्रमाच्या ताब्यात तीन हजार १०० बसगाड्या आहेत. त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून काही गाड्या चालवण्यासाठी घेण्यात आल्या आहेत. तसेच ४० विना वातानुकूलन बसगाड्या, १६० वातानुकूलित मिडी बस गाड्या, तर १४० वातानुकूलित सिंगल डेकर बस चालविणार आहेत.
च्बेस्ट उपक्रमाकडे स्वत:च्या मालकीच्या सहा इलेक्ट्रिक बसगाड्या असून, ३२ इलेक्ट्रिक बसगाड्या भाडे तत्त्वावर चालणाऱ्या आहेत.