मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यादरम्यान इमारती ढासळून मोठी हानी होते. ही हानी होऊ नये म्हणून मुंबई महापालिका, म्हाडा पावसाळ्यापूर्वी येथील इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करते आणि धोकादायक, अतिधोकादायक इमारती यादी जाहीर करते. शिवाय येथील नागरिकांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करते. आता म्हाडानेही पावसाळापूर्व सर्वेक्षण केले असून, त्यानुसार त्यांनी १८ इमारती अतिधोकादायक असल्याचे म्हणत त्यांची यादी जाहीर केली आहे.
या सर्वेक्षणात १८ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या अतिधोकादायक १८ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ७ इमारतींचाही समावेश आहे. म्हाडाकडून प्राप्त माहितीनुसार, अतिधोकादायक इमारतींमध्ये ३१७ निवासी व २२३ अनिवासी असे एकूण ५४० रहिवासी आहेत. १२१ निवासी रहिवाशांनी त्यांची स्वत:ची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत २० रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित ३५४ निवासी रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे.सर्वेक्षण केलेल्या अतिधोकादायक इमारतीच्इमारत क्रमांक १४४, एमजी रोड, अ- ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक ५०-५८, एम. सारंग स्ट्रीट/ओल्ड नागपाडा क्रॉस लेनच्इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमारत रोड (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक ७४ निजाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक १२३, किका स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक २४२-२४४, बारा इमाम रोड,च्इमारत क्रमांक १६६ डी,मुंबादेवी रोड,च्इमारत क्रमांक २३७, संत सेना महाराज मार्गच्इमारत क्रमांक २३९, संत सेना महाराज मार्गच्इमारत क्रमांक १४, भंडारी स्ट्रीटच्इमारत क्रमांक १२ (२), नानुभाई बेहरमजी रोडच्इमारत क्रमांक ३८७-३९१, बदामवाडी, व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक ३९१ डी, बदामवाडी व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक ४४३ वांदेकर मेन्शन, डी ४३१, डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग, गिरगाव (मागील वर्षीच्या यादीतील)च्इमारत क्रमांक २७३-२८१, फॉकलँड रोड (डी-२२९९-२३०१)च्इमारत क्रमांक १, खेतवाडी, १२वी गल्ली (डी २०४९)च्इमारत क्रमांक १०० डी, न्यू स्टार मेन्शन, शाहीर अमर शेख, जेकब सर्कल, ग दक्षिण- ४८(२२),च्इमारत क्रमांक ४४, मोरलँड रोड, सिराज मंझिलअनलॉक अपरिहार्य : अनलॉकमुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार असला तरी यापुढे लॉकडाऊन सुरू ठेवा, असे म्हणणे देश म्हणून आपल्याला परवडणारे नाही, असे मत व्यक्त करणाऱ्या ५२ टक्के लोकांनी अनलॉक ही अपरिहार्यता असल्याचे त्यांचे मत आहे. तर, जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे तेथे लॉकडाऊन शिथिल करायला नको होते, असे मत २७ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. देशातील कोरोना संक्रमणाने आता सर्वोच्च पातळी गाठली असून यापुढे बाधितांची संख्या नक्की कमी होईल, असे १२ टक्के लोकांना वाटते. तर, लॉकडाऊनचा निर्णयच चुकीचा होता, असे ६ टक्के लोकांना वाटत आहे.