तलावांमध्ये १८ टक्के जलसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:12+5:302021-07-09T04:06:12+5:30
मुंबई : तुरळक सरी वगळता पाऊस फिरकलाच नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्याचा पहिला आठवडाही पावसाच्या प्रतीक्षेत ...
मुंबई : तुरळक सरी वगळता पाऊस फिरकलाच नाही. जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्याचा पहिला आठवडाही पावसाच्या प्रतीक्षेत गेला आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. परिणामी, मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कल पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. पावसाचे दिवसही कमी झाले असून, थोड्या दिवसात जास्त पाऊस पडत असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये याच कालावधीत तलावांमध्ये २५ टक्के तर २०२० मध्ये १७.५० टक्के जलसाठा जमा होता. मात्र, त्यानंतर मुसळधार पावसाने तलाव भरून वाहत होते.
महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. सध्या सात तलावांमध्ये मिळून एकूण दोन लाख ६३ हजार ६३१ दशलक्ष लिटर जलसाठा जमा आहे. काही दिवसांनी जलसाठ्याचा आढावा घेऊन पालिका प्रशासन पाणी कपात जाहीर करण्याची शक्यता आहे.
८ जुलै २०२१ रोजी
जलसाठ्याची आकडेवारी( मीटर्समध्ये )
तलाव कमाल किमान उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ४१२९३ १५१.१५
तानसा १२८.६३ ११८.८७ ४४६१९ १२२.५५
विहार ८०.१२ ७३.९२ १६८१७ ७७.९९
तुळशी १३९.१७ १३१.०७ ५९०१ १३७.५०
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ ०००...५९२.६१
भातसा १४२.०७ १०४.९० १३२९०९ ...११४.५०
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० २२०९२ ..२४०.८०
वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के
२०२१ - २६३६३१...१८.२१
२०२० - २५३२५६....१७.५०
२०१८- ३६०९२६...२४.९४