ऐन दिवाळीत १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; कुटुंबाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 18:52 IST2019-10-26T23:49:42+5:302019-10-27T18:52:16+5:30
कुसुमला परदेशात शिक्षणासाठी जायचे होते. मात्र वडिलांचा त्याला विरोध असल्याने तिने हे कृत्य केले

ऐन दिवाळीत १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या; कुटुंबाला धक्का
मुंबई : भांडुप (प ) येथील कुसुम रमेश पुरोहित (वय 18) या तरुनीने रहात्या घराच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याची घटना शनिवारी घडली. तिच्या या कृत्यचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वडिलांशी झालेल्या किरकोळ कारणावरून तिने हे कृत्य केल्याची चर्चा परिसरात होती.
कुसुमला परदेशात शिक्षणासाठी जायचे होते. मात्र वडिलांचा त्याला विरोध असल्याने तिने हे कृत्य केले असल्याची शक्यता वरतविली जात आहे. दिवाळीच्या काळात केलेल्या तिच्या या कृत्यमुळे पुरोहित कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. परिसरात याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कुसुम ही ड्रीम्स सोसायटीच्या 15 व्या मजल्यावर पालक व भावासमवेत रहात होती. दुपारी तिने पोर्चमधून खाली उडी मारली. अत्यवस्थ अवस्थेत तिला सेंट्रल हास्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. याबद्दल भांडुप पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. नातेवाईक, वर्गमित्र मंडळी व शेजाऱ्यांचे जबाब नोंदविन्यायत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.