मुंबई पोलीस दलातील १८ हजार अस्थायी पदांना तीन महिन्याची मुदत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 09:09 PM2017-10-12T21:09:05+5:302017-10-12T21:09:22+5:30

मुंबई पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल १८ हजार ३ १८ अस्थायी पदांना आणखी तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ३१ डिसेंबरपर्यत या पदाच्या मंजुरीला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला असून निर्धारित मुदतीमध्ये त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

18,000 temporary posts of Mumbai Police force have been increased by three months | मुंबई पोलीस दलातील १८ हजार अस्थायी पदांना तीन महिन्याची मुदत वाढ

मुंबई पोलीस दलातील १८ हजार अस्थायी पदांना तीन महिन्याची मुदत वाढ

Next

मुंबई : मुंबई पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल १८ हजार ३ १८ अस्थायी पदांना आणखी तीन महिन्याची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. ३१ डिसेंबरपर्यत या पदाच्या मंजुरीला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला असून निर्धारित मुदतीमध्ये त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिरेक्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असलेल्या मुंबईच्या संरक्षणासाठी ४५ हजारावर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. त्यांच्या कार्यालयीन कामाच्या पूर्ततेसाठी ३ हजारावर प्रशासकीय वर्ग नियुक्त आहे. पोलिसांच्या मनुष्यबळामध्ये गेल्या काही वर्षापासून आवश्यकतेनुसार विविध शाखा व पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र आयुक्तालयाच्या मूळ संरचनेमध्ये त्याला मान्यता न मिळाल्याने अस्थायी स्वरुपात या पदांची मुदतवाढ केली जात आहे. त्यांची मुदत ३० सप्टेंबरपर्यत मुदत होती. त्यांना मुदत वाढ दिल्याखेरीज या पदावरील वेतन व अन्य भत्ते काढता येणे शक्य नसल्याने गृह विभागाने पुन्हा ३ महिन्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ हजार १९१ व १,१२७ या दोन टप्यात ही अस्थायी पदे मंजूर करण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

Web Title: 18,000 temporary posts of Mumbai Police force have been increased by three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.