मद्यसाठ्यासह १८.८० लाखांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:07 AM2021-08-26T04:07:03+5:302021-08-26T04:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात ...

18.80 lakh worth of goods including liquor seized | मद्यसाठ्यासह १८.८० लाखांचा माल जप्त

मद्यसाठ्यासह १८.८० लाखांचा माल जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यसाठ्यासह १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. मुंबई विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आढेगाव-तांबोळे रोडच्या उत्तरेस तपासणी केली असता, गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेला ३०१ पेट्यांमध्ये अवैध विदेशी दारूसाठा आढळला. फरार आरोपी याची विक्री करणार होता. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मद्यसाठ्यासह एकूण १८ लाख ८०२४० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा, विभागीय आयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भरारी पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 18.80 lakh worth of goods including liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.