मुंबई : प्लॅटफॉर्म तिकिट पाच रुपयांवरुन दहा रुपये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्लॅटफॉर्म तिकिटांतून मिळणारे उत्पन्न दुप्पट होणार असल्याचे सांगितले जाते. मध्य रेल्वेने तर गेल्या चार वर्षात प्लॅटफॉर्म तिकिटातून १९ कोटी ६५ लाखांची कमाई केली आहे.आपल्या नातेवाईकांना किंवा सहकाऱ्याला रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही अधिक असते. स्थानकावर आल्यास त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मचे तिकिट काढावे लागते. अन्यथा विनातिकिट प्रवासी म्हणून त्याला गृहीत धरले जावू शकते. मध्य रेल्वे मार्गावर तर प्लॅटफॉर्म तिकिट काढून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून त्यामुळे चांगलेच उत्पन्न मिळत आहे. २0११-१२ रोजी प्लॅटफॉर्म तिकिट हे ३ रुपये होते. त्यानंतर २0१२-१३ रोजी या तिकिटांत दोन रुपये वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत पाच रुपयाप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकिट आकारले जावू लागले. २0११-१२ साली ९0 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याने या काळात २ कोटी ७0 लाखांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले. तर २0१२-१३ साली १ कोटी १0 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याने ५ कोटी ५0 लाख रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. २0१३-१४ साली १ कोटी १९ लाख प्रवाशांनी तर २0१४-१५ (फेब्रुवारीपर्यंत) १ कोटी १0 लाख प्रवाशांनी प्लॅटफॉर्म तिकिट काढल्याने रेल्वेच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली. गेल्या चार वर्षात १९ कोटी ६५ लाख रुपये उत्पन्न प्लॅटफॉर्म तिकिटातून मिळाले आहे. (प्रतिनिधी)वर्ष प्रवासीउत्पन्न (रु)२0११-१२ ९0 लाख२ कोटी ७0 लाख२0१२-१३ १ कोटी १0 लाख५ कोटी ५0 लाख२0१३-१४ १ कोटी १९ लाख५ कोटी ९५ लाख२0१४-१५ १ कोटी १0 लाख५ कोटी ५0 लाख च्पश्चिम रेल्वेला मागील तीन वर्षात ११ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न प्लॅटफॉर्म तिकिटांतून मिळाले आहे. तर वर्षाला प्लॅटफॉर्म तिकिट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जवळपास एक कोटी असल्याचे सांगण्यात आले.
प्लॅटफॉर्म तिकिटांतून १९ कोटींची कमाई
By admin | Published: March 19, 2015 12:43 AM