Join us  

साथीच्या आजारांसाठी १९ लाखांचा दंड वसूल, कार्यवाही न करणाऱ्या संस्थांवर खटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 5:48 PM

शोधमोहिमेत ऑगस्ट अखेरपर्यंत तब्बल १४ हजार ३५८ नागरिकांना पालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 

मुंबई :

मुंबईत म्हणजे राज्यातील डेंग्यू, मलेरियाचे हॉटस्पॉट ठरत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून घरोघरी शोधमोहीम घेऊन डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यात येत आहेत. वेगवेगळी आस्थापने आणि कार्यालयांनाही भेटी देऊन कार्यवाहीही करण्यात येत आहेत. या शोधमोहिमेत ऑगस्ट अखेरपर्यंत तब्बल १४ हजार ३५८ नागरिकांना पालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 

नोटिसा देऊनही अपयशी ठरलेल्या १ हजार २४२ संस्थांविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले सुरू असून, ऑगस्टअखेरपर्यंत तब्बल १९ लाख ७०० रुपयांची दंड वसुली पालिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासांची उत्पत्तीस्थाने व मलेरियाचा फैलाव करणाऱ्या ॲनोफिलिस डासांच्या उत्पत्तिस्थानांकडे दुर्लक्ष करणे मुंबईकरांना चांगलेच महागात पडत आहे. पालिकेकडून डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथजन्य आजरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या सर्व संभाव्य प्रजनन स्त्रोतांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.   झोपडपट्टीसारख्या भागात संयुक्त कार्यवाहीद्वारे भंगार वस्तू काढण्याचे कार्यक्रम राबविले जातात ज्यात कीटक नियंत्रण विभाग, आरोग्य वैद्यकीय अधिकारी एसडब्ल्यूएम विभाग, परिरक्षण विभागाचे कर्मचारी सहभागी असतात.

१ ते १० सप्टेंबरपर्यंतचा कार्यवाही अहवालसोसायटी व व्यापारी संकुलांना त्यांच्या आवारात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे पत्र दिले जाते. त्यानंतरही आवश्यक त्या सूचनांची कार्यवाही न झाल्यास नोटीस बजावली जाते. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान अशा एकूण १४ हजार ३८५ नागरिकांना नोटिसा दिल्या.   

अशी झाली कारवाईजानेवारी ते ऑगस्ट २०२३   नोटीस बजावली - १४३८५  न्यायालयात खेचले - १२४२  दंडात्मक कारवाई - १९ लाख ७०० रुपये मलेरिया , डेंग्यूमध्ये वाढ मुंबईत मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांचा प्रादुर्भाव इतर आजारांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. 

१. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून हे समोर आले आहे. २. १ ते १० सप्टेंबरदरम्यान मलेरियाचे तब्बल ३९०, तर डेंग्यूचे ३५० रुग्ण आढळले. यात रुग्णालये, दवाखाने, यांचा समावेश आहे. 

डेंग्यूघरांची झाडाझडती ३१९२५२कंटेनरची तपासणी ३४१४०५एडिस इजिप्ती डासांची उत्पत्तिस्थाने- ४३७८ 

टॅग्स :डेंग्यूमुंबई