दहा दिवसांत १९ स्टार कासवांची सुटका

By admin | Published: May 13, 2016 03:04 AM2016-05-13T03:04:37+5:302016-05-13T03:04:37+5:30

अंधश्रद्धेच्या नावाखाली दक्षिण भारतातून स्टार कासवांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या दहा दिवसांत १९ स्टार कासवांची सुटका करण्यात आली आहे

19 Star Tasavi's release in 10 days | दहा दिवसांत १९ स्टार कासवांची सुटका

दहा दिवसांत १९ स्टार कासवांची सुटका

Next

मुंबई : अंधश्रद्धेच्या नावाखाली दक्षिण भारतातून स्टार कासवांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्या दहा दिवसांत १९ स्टार कासवांची सुटका करण्यात आली आहे. वांद्रे, वर्सोवा आणि ठाणे येथून या कासवांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्टार कासव घरी ठेवल्यास सुख-समृद्धी नांदते. जादूटोण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. आकाराने लहान असून, एकाच ठिकाणी स्थिर असल्यामुळे या कासवांना घरात ठेवणे सहज शक्य होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या कासवांची मागणी होत असल्याचे दिसून येते. अवघ्या पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपयांमध्ये कासवांची जोडी बाजारात विकली जात आहे.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास वांद्रे पूर्वेकडील चेतना महाविद्यालय परिसरात एक तरुण स्टार कासवांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार, पथकासह पॉज संस्थेने घटनास्थळी सापळा रचला. या ठिकाणी हातात कापडी पिशवीसह संशयास्पद फिरत असलेल्या तरुणाला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीमध्ये स्टार जातीची ६ कासवे आढळली. सोहन काळे (२४) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून, तो मालाड येथील रहिवासी आहे. दोन हजार रुपयांमध्ये तो एक जोडी विकत होता. म्हणून काळेच्या मुसक्या आवळत त्याच्याकडील कासवे जप्त करण्यात आली आहे.
यापूर्वी ३ आणि २ मे रोजी वर्सोवा परिसरातून ६ आणि ठाणे येथून ७ कासवांची सुटका करण्यास पॉज संस्थेला यश आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करत, या कासवांची सुखरूप सुटका करण्यात येत आहे.

Web Title: 19 Star Tasavi's release in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.