१९१६ या हेल्प लाइनवर आजवर आले ६९ हजार ४०७ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 05:11 PM2020-05-24T17:11:30+5:302020-05-24T17:11:57+5:30

२४ एप्रिलपासून कार्यान्वित केली असून, आजवर या मदत सेवेवर ६९ हजार ४०७ कॉल प्राप्त झाले आहेत.

The 1916 helpline received 69,407 calls to date | १९१६ या हेल्प लाइनवर आजवर आले ६९ हजार ४०७ कॉल

१९१६ या हेल्प लाइनवर आजवर आले ६९ हजार ४०७ कॉल

Next



लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांसाठी असलेल्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती देणे, त्यांच्या तक्रारी सोडविणे यासाठी मुंबई महापालिकेने १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर विशेष सेवा २४ एप्रिलपासून कार्यान्वित केली असून, आजवर या मदत सेवेवर ६९ हजार ४०७ कॉल प्राप्त झाले आहेत.

मुंबई महापालिकेने या सेवेसाठी ३ सत्रांमध्ये एकूण ४८ कर्मचारी व ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत. घरी अलगीकरण करण्यात आलेल्या कर्मचा-यांमुळे प्रत्येक सत्रात सध्या ६ कर्मचारी कार्यरत आहेत. या सेवेवर दररोज सुमारे ४ हजार दूरध्वनी संभाषण कार्यक्षमतेने हाताळले जात आहेत. दरम्यान, खाटांच्या उपलब्धतेसाठी सद्यस्थितीची माहिती देणारा संक्षित फलक देखील विकसित करून कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची ने-आण करण्यास मदत होते आहे.

----------------

कशासाठी आले किती कॉल

डॉक्टरांचे मार्गदर्शन १४ हजार २५३
रुग्णवाहिकेच्या सोयीसाठी ११ हजार ३३३
रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेसाठी २१ हजार ३०९
इतर शंका २५ हजार ५३९

Web Title: The 1916 helpline received 69,407 calls to date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.