लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांसाठी असलेल्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती देणे, त्यांच्या तक्रारी सोडविणे यासाठी मुंबई महापालिकेने १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर विशेष सेवा २४ एप्रिलपासून कार्यान्वित केली असून, आजवर या मदत सेवेवर ६९ हजार ४०७ कॉल प्राप्त झाले आहेत.मुंबई महापालिकेने या सेवेसाठी ३ सत्रांमध्ये एकूण ४८ कर्मचारी व ३ ते ४ वैद्यकीय अधिकारी नेमले आहेत. घरी अलगीकरण करण्यात आलेल्या कर्मचा-यांमुळे प्रत्येक सत्रात सध्या ६ कर्मचारी कार्यरत आहेत. या सेवेवर दररोज सुमारे ४ हजार दूरध्वनी संभाषण कार्यक्षमतेने हाताळले जात आहेत. दरम्यान, खाटांच्या उपलब्धतेसाठी सद्यस्थितीची माहिती देणारा संक्षित फलक देखील विकसित करून कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांची ने-आण करण्यास मदत होते आहे.----------------कशासाठी आले किती कॉलडॉक्टरांचे मार्गदर्शन १४ हजार २५३रुग्णवाहिकेच्या सोयीसाठी ११ हजार ३३३रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेसाठी २१ हजार ३०९इतर शंका २५ हजार ५३९
१९१६ या हेल्प लाइनवर आजवर आले ६९ हजार ४०७ कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 5:11 PM