Join us

मुंबईत १९४ मिमी पावसाची नोंद, भिंतींचा भाग पडून ८ जण जखमी, बोटीला झालेल्या अपघातात १० जणांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:06 AM

बोटीला झालेल्या अपघातात १० जणांना फटकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या ...

बोटीला झालेल्या अपघातात १० जणांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कुलाबा येथे १८९ मिमी तर सांताक्रुझ येथे १९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर भिंतीचा भाग पडून ८ जण जखमी झाले. आणि बोटीला झालेल्या अपघातात १० जणांना फटका बसला आहे.

चेंबूर येथे राहत्या घराचे काम सुरू असताना भिंतीचा भाग पडून ४ जण जखमी झाले. त्यांना चेंबूर येथील माँ रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोरीवली येथे क्रेनचा भाग घरावर पडला. यात ३ जण जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. अंधेरी येथे घराचा भाग कोसळून एक महिला जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मढ जेटटी येथे लावण्यात आलेली एक अँकर बोट फुटली. यात ५ जण अडकले होते. ४ लोकांना सुरक्षित बाहेर काढले. १ जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहीम कॉजवे येथेही बोटीचा अँकर तुटला आणि बोट समुद्रात बुडाली. या बोटीत ५ माणसे होती. दाेघे पोहून किनाऱ्यावर आले. एक जण बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोटीवर असलेल्या दोघांना वाचविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मुंबई महापालिकेच्या १९१६ या क्रमांकावर सोमवारी दिवसभरात ४ हजार ८४८ कॉल प्राप्त झाले.

* येथे साचले पाणी

महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, वडाळा, दादर टीटी, सायन, वरळी, ग्रँट रोड, मस्जिद बंदर आणि कुलाबा येथील सखल भागात पाणी साचले. याव्यतिरिक्त अंधेरी सब वे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सब वे, मालवणी, बोरीवली आणि वाकोला येथील सखल भागात पाणी साचले होते.

* ४७९ ठिकाणी झाडे कोसळली

शहरात १५६, पूर्व उपनगरात ७८ आणि पश्चिम उपनगरात २४५ अशा एकूण ४७९ ठिकाणी झाडे कोसळली. १७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. २६ ठिकाणी बांधकामांचा भाग काेसळला.

* बेस्टची वाहतूक वळवली

हिंदमाता, वरळी, सायन, वांद्रे येथील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने बेस्टची वाहतूक वळविण्यात आली.

...............................

----------

मुंबई महापालिकेच्या १९१६ या क्रमांकावर सोमवारी दिवसभरात ४ हजार ८४८ कॉल प्राप्त.

वाऱ्याचा वेग येथे जास्त नोंदविण्यात आला.

कुलाबा : ताशी ११४ किमी

फोर्ट : ताशी ८४ किमी

मरिन लाइन्स : ताशी ७७ किमी

----------

सर्वाधिक पावसाची नोंद ( मिमी)

वरळी २१६

फोर्ट १९१

भायखळा १७५

विलेपार्ले २०२

गोरेगाव २०४

कांदिवली २०६

विक्रोळी १०६

----------