मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध व्हावी यासाठी म्हाडा सातत्याने प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा आधार घेण्यात आला आहे. मंगळवारी म्हाडाचा २०१९-२० सालासाठीचा ८ हजार २५९.७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.गोरेगाव येथे पंतप्रधान आवास योजनेतून १ हजार ९४७ घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पातून समोर ठेवण्यात आले आहे. मुंबई मंडळांतर्गत या घरांची निर्मिती होणार आहे. दरम्यान, जमीन खरेदीसह विकासासाठी १०० कोटी व वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात आहे.इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ५ कोटी २८ लाख रुपये आणि संक्रमण शिबिरासाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.म्हाडाचा २०१९-२० सालचा अर्थसंकल्प ८ हजार २५९.७५ कोटी रुपये एवढा असून, यातील शासकीय अनुदानाची रक्कम ४५७.४४ कोटी रुपये एवढी आहे. महसुली रक्कम१ हजार ५२९.८५ कोटी, भांडवली रक्कम ५ हजार १०.१६ कोटी, कर्जे तसेच अग्रिम ४२१.५९ कोटी, अनामत रक्कम ८४०.७१ कोटी रुपये इतकी आहे.अर्थसंकल्पातील खर्चाचा विचार करता महसुली खर्च १ हजार ४८.४८ कोटी रुपये, भांडवली खर्च ४ हजार ६६३ कोटी, कर्जे व अग्रिम १५४.८७ कोटी तसेच अनामत रकमेचा खर्च ७२७.६१ कोटी रुपये आहे. एकूण खर्चाचा विचार करता तो ६ हजार ५९४.९२ कोटी रुपये असून, यात ९८ कोटींची भर पडली आहे.म्हाडा आणि शासन असा एकत्रित विचार करता ही खर्चाची रक्कम ६ हजार ६९२.९२ कोटी रुपये इतकी आहे. तर, शिल्लक/तूट रक्कम १ हजार ५६६.८३ कोटी रुपये इतकी आहे.>मंडळाला मिळाला निधीमुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी यासंदर्भात सांगितले की, अर्थसंकल्पातून मंडळाला निधी प्राप्त झाला आहे. पीएमजी निधीतून बांधण्यात आलेल्या घरांची दुरुस्ती, सेस इमारतींची दुरुस्ती, संक्रमण शिबिरांची दुरुस्ती, पुनर्रचित इमारतीची दुरुस्ती; यासाठीच्या निधीची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
म्हाडा १ हजार ९४७ घरांची करणार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:17 AM