मुंबई : राज्यात शुक्रवारी ११८ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याची एकूण रुग्णसंख्या ३ हजार ४९५ वर पोहोचली आहे. तर एकूण २१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सात मृत्यूंपैकी पाच मुंबईचे दोन पुण्यातील आहेत. त्यात पाच पुरुष तर दोन महिला आहेत. सातपैकी एक रुग्ण ६० वर्षांवरील आहे. तर सहा रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार होते.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ हजार ७४० नमुन्यांपैकी ५६ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात ७४ हजार ५८७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ६,३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.14,229 रुग्ण देशातनवी दिल्ली : देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार २२९ झाली असून, त्यात गेल्या २४ तासांतील १,०७६ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत देशात ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि २,००६ रुग्ण उपचारांमुळे बरे झाले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण (तीन हजार ) महाराष्ट्रात असून, राजधानी दिल्लीत रुग्णांची संख्या १,६४० आहे. तामिळनाडू (१,२६७), राजस्थान (१,१३१), गुजरात (१,१२१), मध्य प्रदेश (१,०००) या राज्यांतही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. उत्तर प्रदेशात ८४६, तर तेलंगणात ७४३ रुग्ण आहेत. पंजाब आणि केरळ या राज्यांमध्ये मात्र हा आकडा फारसा वाढलेला नाही.अमेरिकेत ३४,७५० रुग्णांचा मृत्यूनवी दिल्ली : जगात कोरोना रुग्णांची संख्या २२ लाख २८ हजार ७८४ झाली असून, त्यापैकी १ लाख ५० हजारांहून अधिक जणांचा आतापर्यंत बळी घेतला आहे. जगात १५ लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत आणि ५ लाख ६३ हजार रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून, तिथे बळींचा आकडा ३४ हजार ७५० आहे. अमेरिकेत बाधितांचा आकडाही झपाट्याने वाढताना दिसत आहे. इटलीमध्ये आतापर्यंत २२ हजार जण मृत्युमुखी पडले आहेत, तर स्पेनमध्ये १९ हजार ५०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये १८ हजार आणि ब्रिटनमध्ये १४ हजार ६०० जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे.