Join us

नायर रुग्णालयात १९२ कोरोना पॉझिटिव्ह मातांकडून १९६ निगेटिव्ह बाळांची प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 7:03 PM

प्रसूती सुखरूप करणाऱ्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्रसुती झालेल्या १९२ महिलांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली मात्र सुदैवाने १९६ नवजात बाळांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही हे सर्व बालक सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.  यापैकी १३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ही रुग्णालयातून देण्यात आली आहे.या १९२ कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या गरोदर मातांनी १९६ नवजात बालकांना जन्म दिला असून त्यात दोन जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात त्या बाळांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच मुंबईतील नायर रुग्णालयात १४ एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास ३२५ कोरोना पॉझिटिव्ह माता वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या असून त्यापैकी काहींची प्रसुती झाली तर काही महिलांवर उपचार सुरू आहेत. वयोवृद्ध, गर्भवती महिला , दिर्ग आजार असणार्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटीव्ह आल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.मातेने बाळाला हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. बाळ आधी निगेटीव्ह आले तरी ते हाताळण्यातून पॉझिटिव्ह येऊ शकते. गर्भात किंवा दुध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नसल्याची माहिती तेथील बालरोगतज्ज्ञांनी दिली.  दरम्यान प्रसुतीवेळी डॉक्टरांकडून निर्देशित सूचनांप्रमाणे आवश्यक कार्यवाही आणि खबरदारी घेऊनच या मतांची प्रसूती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या